मुंबई, : मुंबई पोलीस दिनदर्शिका-2017 चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी करण्यात आले.
यावेळी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, पोलीस सहआयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.
या दिनदर्शिकेत जनतेच्या संरक्षणाची ग्वाही देणाऱ्या तसेच मुंबई पोलीसांच्या शौर्याची गाथा मांडणाऱ्या आकर्षक छायाचित्रांची मांडणी करण्यात आली आहे.

