कोविड-19 जनजागृतीचे काम लोकचळवळ स्वरुपात करा-विभागीय आयुक्त सौरव राव

Date:

पुणे, दि.2 कोविड-19 बाबत नागरिकांच्या मनात सकारात्मक बदल घडवून आणण्यसाठी प्रसार व प्रसिध्दीच्या माध्यमातून जनजागृतीचे काम लोकचळवळ स्वरुपात करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 जनजागृती विषयक आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. बाविस्कर, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. दिलीप कदम, एनजीओ प्रतिनिधी मेधा काळे, युनिसेफ सल्लागार प्रविण पवार यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सौरव राव म्हणाले, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या मनात कोविड-19 बाबत जनजागृती होणे खुप महत्वाचे आहे. यासाठी मुद्रीत व इलेक्ट्रानिक माध्यमे, आकाशवाणी, एफ.एम. समाज माध्यमे यांच्या माध्यमातून सतत जगजागृती होणे गरजेचे आहे. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.
सार्वजनिक ठिकाणी वावरत असतांना कोरोनारुप वर्तवणूकीचे पालन केले पाहिजे. त्यामध्ये मास्कचा सतत वापर केला पाहिजे. वारंवार हात सॅनिटॉयझर केले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. राव यांनी केले.
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी कोविड-19 जनजागृती विषयक सुरु असलेल्या कार्यप्रणालीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...