राज्याच्या गावागावात क्रीडासंस्कृती पोहचवण्याचा जागतिक ऑलिंपिंक दिनाच्या निमित्तानं निर्धार — उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष
अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेछा

मुंबई, दि. २२ :- “खेळ हे मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. खेळ माणसाला सुसंस्कृत बनवतात, आनंदानं जगायला शिकवतात. खेळ माणसाला शरीरानं, मनानं तंदुरुस्त ठेवतात. एकता, समता, बंधुता, खिलाडूवृत्तीनं वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सुसंस्कृत, समर्थ, सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्यानं महाराष्ट्राच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती पोहचली, रुजली, वाढली पाहिजे. असं झालं तरंच देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येन निर्माण होतील. महाराष्ट्राचं नाव उज्वल करतील. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचा निर्धार आज जागतिक ऑलिंपिक दिनी करुया” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आज जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव साहेबांची मला आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपानं देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्रानं मिळवून दिलं होतं. ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. हे मोठे खेळाडू आहेत. त्यांनी मेहनत घेतली आहे. पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची त्यांची जिद्द आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीनं या खेळाडूंच्या पाठीशी उभं आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी टोकियो ऑलिंपिकमधील यशासाठी महाराष्ट्राच्या, देशाच्या ऑलिंपिक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीनं जात असताना, सर्व खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमनं कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी असलं तरी अनेक देशातून तिथं खेळाडू येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूंन, सपोर्ट टीमच्या सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्या. कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करा. स्वत:ला, सहकाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
राज्यावर, देशावर दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. खेळाची मैदानं, जिम, क्रीडास्पर्धांचं आयोजन अनेक गोष्टींवर वर्षभरापासून निर्बंध आहेत. काही ठिकाणी निर्बंध शिथील झाले असले तरी गेले वर्षभर, अनेकांना घराबाहेर पडता आलं नाही. मैदानात खेळता आलं नाही. जिममध्ये व्यायाम करता आला नाही. सतत घरात आणि एकाच जागेवर दीर्घकाळ बसून राहण्याचे जे दुष्परिणाम असतात, ते अनेकांच्या शरीरावर दिसू लागले आहेत. जागतिक खेळाडू असू देत की, तुमच्या-माझ्यासारखी सामान्य व्यक्ती. प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे. घरात-अंगणात-गच्चीवर सोशल डिस्टन्सिंग राखून व्यायाम सुरु ठेवा. चालणं, धावणं यासारखे हालचाल वाढवणारे व्यायाम शरीर, मन तंदुरुस्त ठेवतात. योगा-प्राणायामानं हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. पैशापेक्षा आरोग्य महत्वाचं आहे हे कोरोना संकटानं आपल्याला सांगितलं. जान है तो, जहाँ है.. हे सुद्धा पटवून दिलं. तेव्हा प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्यावी, स्वत:ला फिट-तंदूरुस्त ठेवावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केली आहे.
माझं कुटुंब… माझी जबाबदारी. माझी सोसायटी, माझं गाव, माझं शहर, माझा तालुका, जिल्हा, माझं राज्य, माझा देश ही सुद्धा माझी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा.राज्याला, जगाला, कोरोनामुक्त करायचं असेल तर, सुरुवात, मी स्वत:पासून, स्वत:च्या कुटुंबापासून केली पाहिजे. आजच्या जागतिक ऑलिंपिक दिनी आपण स्वत:ला व कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचा संकल्प करुया, असे सांगत टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावं, अशी देशवासियांची लोकभावना आहे. त्या लोकभावनेचा आदर होईल आणि तो केला जावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
जागतिक ऑलिंपिक संघटना असो की महाराष्ट्र आलिंपिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्तानं त्यांनी राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.
०००००००००००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...