राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल;टाटा कंपनीकडून ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट

Date:


पुणे दि.28 :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सर्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ३०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ४ ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य सेवा (उपसंचालक) डॉ. मिलींद मोरे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे (उपसंचालक) डॉ. संजोग कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याच्याअर्थसंकल्पात ४४२ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून ४४२ नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी १२, सातारा १३, सोलापूर ९, कोल्हापूर १७ आणि सांगली ९ रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...