पुणे, – राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील जानेवारी ते मे,2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या सहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येणार असून दि.6ते 13 डिसेंबर 2016 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, 14 डिसेंबर,2016 रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी अंतिम दिनांक 16 डिसेंबर,2016 असून दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात येवून अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास 28 डिसेंबर,2016 रोजी सकाळी 7-30 वाजल्यापासून सायंकाळी 5-30 पर्यत मतदान घेण्यात येणार आहे. 28 डिसेंबर,2016 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ) तहसीलदार निश्चित करतील 29 डिसेंबर,2016 रोजी ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निकाल प्रसिध्द करण्यात येणार आहे.