पुणे- पोलीस आयुक्तालय व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दि. 20 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस ग्राऊंडवर करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक संचालक गं. अ. सांगडे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील पुणे शहर, भोसरी व चाकण या औद्येागिक परिसरातील 31 उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून एकून 3 हजार 406 रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पाल्य व इतर उमेदवारांसाठी किमान 10 वी, 12वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, बीबीए, ड्रायव्हर्स इ.पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना रविवार,दिनांक 20नोव्हेंबर 2016 रोजीच्या मेळाव्यांतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस (walk-in-lnterview) उपस्थित राहुन,या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. सहभाग घेणऱ्या सर्व उमेदवारांनी www.maharoigar.gov.in या वेबसाईटवर जाऊन उदयोजकांची मागणी पाहुन आपली ऑनलाईन संमती नोंदवावी. या बाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 020-26133606 वर श्री.तु.गं.डगळे, कौ.वि.रो.व.उ मार्गदर्शन अधिकारी किंवा वि.शां. दळवी यांच्याशी संपर्क साधावा. महिलांसाठी ॲडविक हाय–टेक प्रा.लि.खराबवाडी, चाकण,ॲम्फेनॉल इंटरकनेक्ट इंडिया प्रा.लि.भोसरी इंडस्ट्रीयल एरिया,पुणे-26 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस लिमिटेड, सह्याद्री पार्क, हिंजेवडी पुणे -411057 या उद्योजकांनी महिलांसाठी जागा असल्याचे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.