पुणे :- विद्यापीठाचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नूतनमहाराष्ट्र विद्या तंत्र निकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय व इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 आक्टोबर, 2016 रोजी सकाळी 10 ते ३ या वेळेत नूतन महाराष्ट्र विद्या तंत्र निकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय, समर्थ संकुल, तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ,
तळेगाव येथे बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा पुणे जिल्ह्यातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत. इ.12 वी, कोणत्याही शाखेचा पदवीधर, आय.टी.आय., इंजिनिअरींग पदवीधर व पदवीकाधारकांनी लाभ घ्यावा. मेळाव्यास
उपस्थित राहाताना उमेदवारांनी आपले सी.व्ही, फोटो, व इतर शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत. एम्प्लॉयमेंट कार्यालयाकडे नाव नोंदणी नसलेले उमेदवार देखील या संधीचा लाभ घेवू शकतात, असे आवाहन सहायक संचालक विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
Date:


