विश्वासदर्शक ठराव, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन

Date:

विधानमंडळ सचिवालयाची माहिती

मुंबई,नवीन मंत्री महोदयांचा परिचय आणि मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची बैठक शनिवारदिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 02.00 वाजता विधानभवनमुंबई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभेच्या सर्व सदस्यांनी विधानभवनमुंबई येथे विधानसभेच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवारदिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता विधानसभा सभागृहात घेण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र शनिवारदिनांक 30 नोव्हेंबर, 2019 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत कक्ष क्र.021, तळ मजलाविधानभवनमुंबई येथे सचिव (कार्यभार)महाराष्ट्र विधानसभाविधान भवनमुंबई यांच्याकडे पोहोचतील, अशा बेताने पाठविण्यात यावेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी त्याचदिवशी दुपारी 12.00 वाजता करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत रविवारदिनांक 01 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत असेल. नामनिर्देशनपत्र आणि उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाच्या प्रती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या ‘ कक्षअकरावा मजलाविधानभवनमुंबई येथे उपलब्ध असून या निवडणुकीचा कार्यक्रमनोटीसनामनिर्देशनपत्रउमेदवारी मागे घेण्याच्या अर्जाचा नमूना इत्यादी सर्व कागदपत्रे विधानसभा सदस्यांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रती महाराष्ट्र विधीमंडळाच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे श्री.भागवत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...