क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेस राज्य शासनाची मंजुरी

Date:

सातारा :  कोरोना जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता दिली आहे.  राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून साताऱ्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी देऊन यासाठी आवश्यक असलेल्या ७५ लाख ४६ हजार १८६  इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी/ जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामुग्री ई-टेंडर ऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्याकडील १८ एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता दिली आहे.

सातारा जिल्ह्यात आरटी पीसीआर लॅब नसल्याने कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णांचे स्वॅब नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत.  जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे ही कंटेन्मेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांचे लक्षणे दिसत असल्यास कोरोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी बघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. व मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात आरटी पीसीआर लॅबसाठी प्रस्ताव पाठविला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भारताने बांगलादेशला 5,000 टन डिझेल पाठवले

भारताने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून क्रॉस-बॉर्डर पाइपलाइनद्वारे बांगलादेशला डिझेल पाठवणे...

व्यावसायिक पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याचे दावे दिशाभूल करणारे, शासनाकडून महत्त्वाचे आवाहन

आखाती देश इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे...

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...