Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू

Date:

मुंबई दि. 12 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात ( तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत ) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळीचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे

चार मेपासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु . २ प्रति किलो दराने गहू व रु . ३ प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत ५१ % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे .

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ५९००० / – पेक्षा जास्त व रूपये १ लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना गहू रू . ८ / – प्रति किलो व तांदूळ रू . १२ / – प्रति किलो या दराने प्रति माह प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ याप्रमाणे ५ किलो अन्नधान्याचे मे महिन्याचे वितरण दिनांक २४ एप्रिलपासून सुरू करण्यात आले असून सदर अन्नधान्याचे वितरण मे महिन्यातही सुरु राहील . आतापर्यंत तांदूळ २४९४ मेट्रिक टन आणि गहू ३४४३ मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे २० % शिधापत्रिकाधारकांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे .

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या

http : //mahaepos.gov.in या वेबसाइट वरील Rc Details मध्ये जाऊन शिधापत्रिकाधारकांना त्यांचे शिधापत्रिकेकरीता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC Number टाकून खातरजमा करावी . याबाबत तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक ०२२ – २२८५२८१४ तसेच ई – मेल क्रमांक dycor.ho.mum @ gov.in यावर तक्रार नोंदवावी . जर अधिकृत शिधावाटप दुकानदाराने त्यानुसार अन्नधान्य न दिल्यास त्याच्याविरूध्द कडक कार्यवाही करण्यात येईल .

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) शिधापत्रिकाधारकांनी स्वत : हून त्यांचे धान्य सोशल डिस्टन्सिगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन प्राप्त करुन घ्यावे .

राष्ट्रीयअन्नसुरक्षा योजनेतील ( NFSA ) तसेच एपीएल ( केशरी ) शिधापात्रिकाधारक यापैकी एकही शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वचिंत राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत . अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी  शिधावाटप दुकाना समोर गर्दी करु नये , असे आवाहन  कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यभरातील अनधिकृत चर्च पाडणार- बावनकुळे

मुंबई--नवापूर तालुक्यात १९९ बेकायदा चर्च आहेत. यातून स्थानिक आदिवासींचे...

अभियंता असलेला प्रियकर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या प्रेयसीला द्यायचा रबडीमधून गर्भपाताच्या गोळ्या..

पुणे- अभियंता असलेला प्रियकर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असलेल्या प्रेयसीला द्यायचा...

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचे काम वेगाने -प्रसाद काटकर

पुणे-महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम...