पुणे, दि. २१ :- कोरोनाविरोधी लढ्याला बळ देण्यासाठी ‘बारामती अॅग्रो’ यांच्यावतीने पुणे शहर आणि विभागासाठी ६७ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन येथे लोकार्पण करण्यात आले. यापैकी २७ कॉन्सन्ट्रेटर पुणे शहरासाठी तर ४० कॉन्सन्ट्रेटर पुणे विभागासाठी वापरले जाणार आहेत.
यावेळी आ. चेतन तुपे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आ राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर महिलाध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष महेश हांडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, पुणे विभागीय आयुक्तालयाचे, पुणे महापालिकेचे अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘बारामती अॅग्रो’ने कोरोना संकटकाळात नागरिकांना ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन आज ६७ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण केले.
नारायणपूर, बारामती येथील शासकीय रूग्णालयांसह पुण्यातील ससून रुग्णालयाला वेळोवेळी सिरींज पंप, बेबी वॉर्मर, रुग्णवाहिका, सक्शन मशीन, व्हिल चेअर, वॉटर कुलर आदी उपकरणे उपलब्ध करुन वैद्यकीय यंत्रणा बळकट करण्यास बारामती अॅग्रोने हातभार लावला.
00000
बारामती अॅग्रोने दिलेल्या ६७ ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Date:

