22 मृत्यू आणि 250 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्यानंतर मोदींनी सोडले मौन

Date:

नवी दिल्ली- उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये सीएएविरोधात भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे तर 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. जीटीबी रुग्णालयात 21 आणि जेपी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. घटनेच्या चौध्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांतता राखण्याचे अपील केली आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचार होत असलेल्या परिसरांमध्ये लष्कर तैनात करण्याची मागणी केली. सरकारने आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एनएसए अजीत डोभाल यांना जबाबदारी दिली आहे. बुधवारी दुपारी ते डीसीपी नॉर्थ-ईस्ट यांच्या कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डोभाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्रालयाला रिपोर्ट करतील.

दुसरीकडे, मंगळवार-बुधवारच्या रात्री 12.30 वाजता एका वकीलाच्या याचिकेवरुन दिल्ली कोर्टाने सुनावनी घेतली. मुस्तफाबाद हिंसाचारातील नागरिकांना येथील अल हिंद रुग्णलयातून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचे आदेश दिले. उत्तर-पूर्व दिल्लीतील चांदबाग परिसरात आज एका आयबी अधिकारी अंकित शर्माचा मृतदेह आढळून आला.

अमित शाह देतील कॅबिनेटला माहिती आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मीटिंग झाली. यात गृहमंत्री अमित शाह कॅबिनेटला दिल्लीतील परिस्थिती सांगतील. यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या रणनितीवरही चर्चा होईल. एसएन. श्रीवास्तव यांना दिल्ली पोलिसांचा स्पेशल कमिश्नर (लॉ अँड ऑर्डर) बनवले आहे.

डोभाल यांच्या खांद्यावर दिल्लीची जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल यांच्यावर दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते थेट पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाला रिपोर्ट करतील. मंगळवारी रात्री डोभाल यांनी दिल्ली पोलिस कमिश्नर अमूल्य पटनायक आणि स्पेशल सीपी एसएन. श्रीवास्तव यांच्यासोबत जाफराबाद आणि सीलमपुरमधील हिंसाचार झालेल्या भागांचा दौरा केला. तसेच, येथील स्थानिकांशी चर्चाही केली.

केजरीवाल म्हणाले- लष्कर तैनात करा बुधवारी सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीतील परिस्थिती चिंताजनक आहे. पोलिसांनी अनेक प्रयत्न करुनही स्थिती नियंत्रणात येत नाहीये. हिंसाचार घडत असलेल्या भागांमध्ये लष्कर तैनात करुन संचारबंदी लावावी. मी याबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहीणार आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...

४ वर्षेच का मुंबई महापालिका अर्थकारणाची २५ वर्षाची चौकशी होऊ द्यात -भाजप आमदार अमित साटम

मुंबई मनपा चौकशीवरून भाजप-सपा आमने-सामनेमुंबई- महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधानसभा...