पुणे : देशातील माझे सर्व बांधव सुरक्षित राहावेत म्हणून जवान सीमेवर तैनात असतात. ते देशावर येणार्या संकाटाला परतून लावत आसतात. अशी वेळी त्यांना प्रोत्सहान देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्यातील बेलेवाडी येथील शहीद जवान सातप्पा पाटील यांच्या पत्नी आश्विनी पाटील यांनी केले आहे.
डेक्कन शिक्षण संस्था व सिर्फ फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.11 डिसेंबर) शहीद जवान लान्स नायक चंद्रकांत गलांडे, सातारा जिल्ह्यातील बीएसएफचे शिपाई नितीन कोळी,कोल्हापूरचे राजेंद्र तुपारे व साताप्पा पाटील यांच्या कुंटूबियांना विद्यार्थ्यांच्या खरी कमाईतून संकलित झालेला एक लाख 35 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी आश्विनी पाटील बोलत होत्या.
यावेळी डेक्कन शिक्षण संस्थेचे शरद कुंठे, अतिरिकक्त आयकर आधिकारी प्रदिप नाईक फाउंडेशनच्या सुमेधा चितडे यांची उपस्थिती होती.
आश्विनी पाटील म्हणाल्या पैशाला मोल नसते. ते तुम्ही कोणत्या भावनेने देत आहात हे म्हत्त्वाचे आहे. किडे मुंग्याही जगतात आपण तर बुद्धी असलेले माणसे आहोत. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या बुद्धीचा योग्य वापर केला पाहीजे. आपण दररोज देवाकडे स्वत:साठी प्रार्थांना करतो. पण यापुढे स्वत:सह सीमेवर उभे असलेल्या बहादूर जवानासाठी करुया अशी सादही आश्विनी पाटील यांनी उपस्थितांना घातली. यावेळी त्यांनी पाकच्या नापाक कारवायांचा खरपूस समाचार घेतला.
शासनाकडून मिळणारी मदत नाकारली
साताप्पा पाटील शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना अर्थिक मदत केली जात होती. परंतु साताप्पा पाटील यांच्या पत्नी आश्विनी यांनी शासनाकडून मिळणारी मदत नाकारुन त्या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील साताप्पा पाटील यांच्या बेलेवाडी या गावात 8 वी ते 10 वी पर्यंत शाळा बांधकाम करण्याची सुचना केली. त्यानुसार 26 जानेवारी 2014 रोजी शाळेच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. सध्यस्थितीत बांधकाम अंतीम टप्प्यात असल्याचे आश्विनी पाटील यांनी सांगितले.
——
पतीचे स्वप्नपूर्ण करणार
तुम्ही आमच्याबद्दल दाखवलेली आत्मीयता खुप महत्वाची आहे. पैशाने सगळच काही मिळत नाही. पण तुमी दाखवलेली आत्मियता आम्हाला बळ देणारी आहे. मी माझ्या दोनीही मुलांना सैन्यात पाठवण्याचा संकल्प केला आहे. पतीने सुरवातीलाच मी माझ शिक्षण पूर्ण करावे, हे त्यांचे स्वप्न होते. मी उच्च शिक्षण घेऊन पतीचे स्वप्न पूर्ण करणार आसल्याचे शहीद नितीन कोळी यांची पत्नी संपती कोळी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.