पुणे-गोल्डन स्काय हेल्थ अँड लाईफ केअर फाऊंडेशन आणि व्ही गोल्डन एज यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव बुद्रुक येथील केअर सेंटर मधील रुग्णांसाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत . लुई बेल अंध अपंग कल्याणकारी संस्था या संस्थेतील अंध कलाकारांनी सुमधुर गीते सादर करून रुग्णांचे मनोरंजन केले .
व्ही गोल्डन एज हि संस्था, ज्या वृद्ध रुग्णांचा घरी ,तसेच हॉस्पिटल मध्ये उपचार करणे अशक्य बनले आहे , अशा रुग्णांचा सांभाळ आणि त्यांच्यावर उपचार करते . गेली अनेक वर्षे या संस्थेचे कार्य सुरु असून या रुग्णांना या संस्थे चा खूप मोठा आधार आहे. हि संस्था सामजिक बांधिलकी च्या भावनेतून अश्या प्रकारचे विविध कार्यक्रम वर्षभर सतत राबवत असते .
सदर कार्यक्रमास विकास नाना दांगट पाटील , शेखर मोहिते पाटील , दीपक पोटे, गणेश भिंगारे, आदी मान्यवर उपस्थित होते . मंडळाच्या संचालकाने आभार प्रदर्शन केलं.
अंध कलाकारांनी सुमधुर गीते सादर करून रुग्णांचे केले मनोरंजन.. वाहव्वा ..
Date:

