पुणे : कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसच्या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे दि. 18 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत मोफत निवासी प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. 16 नोव्हेंबर 2016 रोजी सर्व कागदपत्रांसह जिल्हा सैनिक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) बिपीन शिंदे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, संघ लोकसेवा आयोग (upsc) नवी दिल्ली यांचेमार्फत दि.14 फंब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणाऱ्या कंम्बाईड डिफेन्स सव्हिसेस (CDS) संरक्षण दलातील अधिकारी पदाच्या परीक्षेकरीता एम्प्लॉयमेंट न्युज (रोजगार समाचार) मध्ये जाहिरात दि.9नोव्हेंबर 2016 मध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम मुदत दि.2 डिसेंबर 2016 आहे.कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) यापरीक्षेद्वारा कायमस्वरुपी व अल्पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्यात येत असते. जे उमेदवारा पदवीधर असून सीडीएस परिक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरुन पाठवतील व रोजगार समाचार मध्ये दिलेल्या शैक्षणिक शारिरिक,वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवारांची निवड परिक्षापुर्व प्रशिक्षापुर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,नाशिक येथे करण्यात आली आहे. सीडीएस परिक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http://www.upsconline.nic.in या वेबसाईट चा वापर करण्यात यावा. या बाबतच्या अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवरून संपर्क साधावा.