पुणे- नगरसेवक प्रवीण चोरबेले यांची सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिराच्या विश्वस्त पदी निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीचे पत्र राजकुमार अगरवाल आणि अॅड.प्रताप परदेशी ह्यांच्या शुभहस्ते देण्यात आले. प्रवीण चोरबेले हे पुणे शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करीत आहेत.त्याच बरोबर त्यांनी पुणे मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेले आहे. त्यांच्या कामाची व्याप्ती हि खूप मोठी व चांगली असून त्यांच्या ह्या अनुभवाचा फायदा नक्कीच श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टला देखील होणार आहे. महालक्ष्मी मंदिर हे खूप जुने मंदिर असून दरवर्षी नवरात्र उत्सवात भाविकांची गर्दी होते.ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.
श्री बन्सीलाल रामनाथ अगरवाल ट्रस्ट यांनी ह्या मंदिराचे निर्माण केले आहे. ह्या मंदिराच्या निर्माणास १२ वर्षे लागली होती.पुणे शहरातील गणपती उत्सव, दिपावळी आदी सणांच्या वेळी मंदिरामध्ये देवीचे दर्शन घ्यायला भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.प्रवीण चोरबेले ह्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टला नक्कीच होईल.

