पुणे- पुणे शहरामध्ये कोरोनाचे पेशन्ट वाढले असून त्यामुळे कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून अश्या गरजू नागरिकांना व तसेच होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना नगरसेवक आबा बागुल व मुकुल माधव फाउंडेशन संयुक्त विद्यमानाने विनामूल्य जेवणाची व्यवस्था आजपासून सुरू करण्यात आली असून प्रभागातील गरजू नागरिकांना व होम क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना घरपोच जेवण देण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागूल,आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत बागूल आणि सहकारी करत आहेत. यासाठी सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करून दुपारी 1 ते 3 या वेळेत जेवणाचे वितरण करण्यात येते.
कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले असून लॉकडाउनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आल्याने नागरिकांसाठी दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.

