2009-10 मध्ये स्वाइन फ्लूने घेतले हाेते दीड लाखापेक्षा अधिक बळी
नवी दिल्ली. काेराेनामुळे जगभरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अाकडेवारीने शुक्रवारी एक लाखाचा टप्पा अाेलांडला. इटलीमध्ये सर्वाधिक १८,२७९, तर दुसऱ्या क्रमांकावरील अमेरिकेत १६,६९७ मृत्यू झाले अाहेत. गेल्या वर्षीच्या नाेव्हेंबरच्या शेवटी चीनच्या वुहान शहरातून या संसर्गाचा फैलाव सुरू झाला हाेता. गेल्या पाच महिन्यांत भारतासह जवळपास संपूर्ण जगाला या विषाणूने डंख मारला अाहे. एकूण १६ लाख २१,७७१ रुग्णांपैकी १ लाख रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला अाहे. भारतात अातापर्यंत ७,०४९ जणांना संसर्ग झाला असून त्यापैकी २३६ जणांचा मृत्यू झाला अाहे. जगभरात ६ टक्के दराने रुग्णांचा मृत्यू हाेत असला तरी भारतात मात्र मृत्यूचा वेग केवळ ३.३% अाहे. अमेरिकेत हा दर ३.६%, इटलीमध्ये १२.७२%, ब्रिटन १२%, स्पेनमध्ये ९.७ % असून युराेपला मात्र हा दर २.०९% वर नियंत्रित करण्यात यश अाले अाहे.
अाधी २००९-१० मध्ये जगभरात स्वाइन फ्लूमुळे १.५ लाखापेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला हाेता. अमेरिकेच्या राेग प्रतिबंध अाणि नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार १९६८-६९ मध्येदेखील हाँगकाँग फ्लूमुळे १० लाख लाेेकांना प्राण गमवावे लागले हाेते.
युराेपमध्ये सर्वात जास्त संसर्ग, येथे सर्वात जास्त ६७ हजार मृत्यू
काेराेना व्हायरस संसर्गाचा युराेपवर सर्वाधिक परिणाम झाला अाहे. येथे जगभरातील सर्वाधिक ७ लाख ९२ हजार ३४४ संक्रमित अाढळले अाहेत. यापैकी ६७ हजार जणांचा मृत्यू झाला अाहे. इटलीमध्ये १८,८४९, स्पेनमध्ये १५,९७० अाणि फ्रान्समध्ये १२,२१० जणांचा मृत्यू झाला अाहे.
देशांच्या तुलनेत बघितल्यास अमेरिकेत सर्वात गंभीर स्थिती अाहे. येथे ४,८०,६१५ लाेक संक्रमित असून यापैकी १७,९२७ जणांचा मृत्यू झाला अाहे.

