पुणे :- गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आज आयोजन करण्यात आले. गोयल गंगा इंटनैशनल स्कुलमध्ये आज सकाळी ८ पासूनच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल, जयप्रकाश गोयल उपस्थित होते.
याशिवाय गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांच्या हस्ते कोंढव्यातील डॉ. बांदोवाल्ला सरकार कुष्ठरोगाचे हॉस्पिटल, सिंहगड इन्स्टिटूट या ठिकाणी मोफत औषधवाटप करण्यात आले होते.
यावेळी त्या म्हणाल्या कि समाजासाठी ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे. रक्तदान करा, हे जीवनदान देण्यासाठी आवश्यक आहे. समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करुन रक्तदान वाढवणे ही आजच्या काळाची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या युगात वाढते औद्योगिकरण व त्यांच्याशी संबंधित शारीरिक व्याधी वाढत आहेत त्यामुळेच वेळीच याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे. यासाठी आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्याही गरजू व्यक्तीला औषधांच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागू नये यासाठी जास्तीत जास्त समाजसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज असल्याची भावना देखील जयप्रकाश गोयल यांनी मांडली.

