पुणे : उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे.त्यामुळे प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कसबा मतदार व अनिल बेलकर मित्र परिवार यांच्या वतीने येथील शिंदे हायस्कुलच्या मैदानावर नामदार करंडक या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
उदघाटन प्रसंगी नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, अनिल बेलकर, नितीन पंडित, उदय लेले, राहुल माने, रोहित करपे, प्रतिक शहा यांच्यासह कसबा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, आपले शरीर आणि मन स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांनी पावसाच्या अडथळा आल्याने रद्द करण्यात आलेल्या स्पर्धा पुन्हा जिद्दीने भरवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.
नगरसेवक हेमंत रासने यांनी नामदार गिरिश बापट राजकारणाच्या पिचवर ४० वर्षे नाबाद असल्याचे सांगत या स्पर्धेचे नामदार करंडक हे नाव सार्थक असल्याचे सांगितले.
तरुणांना एकत्रित आणून विधायक उपक्रम राबवायचा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अनिल बेलकर यांनी सांगितले.