पुणे : रमजानच्या पवित्र महिन्यात मागितलेली दुवा कबुल होत असल्याने देशाच्या प्रगतीसाठी दुवा मागावी अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवासाच्या निमित्ताने मंत्री बापट यांच्याकडून सर्वधर्मीय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवन मध्ये हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडें, सीआयडीचे डीआयजी सुनिल रामानंद, मौलाना निजामुद्दीन,मौलाना मुफ्ती शाहिद, मौलाना अक्रम मदारी, शिक्षण तज्ञ पी.ए.इनामदार,जेष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, नंदकुमार सुतार, निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे, शिवसेनेचे अजय भोसले, माजी नगरसेवक रशीद शेख, उद्योजक विठ्ठल मणियार, समाजसेवक दत्ता गायकवाड, कलाकार अन्वर कुरेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आयसीएसईच्या बोर्डात बारावीला ९३ टक्के गुण मिळवणाऱ्या फरदिन खान तसेच दहावीला ९१ टक्के गुण मिळवणाऱ्या अलिना शेख यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. फर्दीन हा मूळचा काश्मीरचा असून शिक्षणासाठी तो पुण्यात आला आहे. मंत्री बापट यांनी या दोघांना खजूर भरवून रोजा इफ्तार सोडला. या नंतर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला.
यावेळी बोलताना श्री बापट म्हणाले,रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली दुवा मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून आल्लाचा आशीर्वाद प्राप्त होत असल्याने देशाच्या प्रगती साठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागावा अशी भावना व्यक्त केली .आपल्या सर्वांनी केलेली दुवा कबूल होऊन देशाची उत्तमोत्तम प्रगती होत राहील असेही ते म्हणाले.
सर्वाना सोबत घेवून सर्वांचा विकास करण्याचा पालकमंत्री बापट यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळेच पुण्यात त्यांच्याविषयी एक आदर आहे. त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित आहे. असे मौलाना निजामुद्दीन यावेळी म्हणाले.


