पुणे – केंद्र सरकारने आणलेल्या वस्तू व सेवा कराचे क्रेडाई महाराष्ट्रने स्वागत केले आहे.
संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “एक मोठी सुधारणा म्हणून क्रेडाई जीएसटीचे स्वागत करते कारण त्याद्वारे सर्व केंद्रीय व राज्य करांचे संपूर्ण देशासाठी एका सर्वसमावेशक करात एकीकरण होत आहे आणि अनेकविध कर आकारणी संपणार आहे.व्यापार आणि उद्योगाला जीएसटीचा सर्वाधिक फायदा होणार आहे, कारण केंद्र आणि राज्याच्या पातळीवरील बहुविध कर आकारणी त्यातून संपणार आहे. त्याच्या परिणामी होणारा परिणामही संपणार आहे. मात्र अन्य सर्व क्षेत्रांमध्ये जीएसटी ही त्यांची संपूर्ण अप्रत्यक्ष कर जबाबदारी असेल,परंतु बांधकाम क्षेत्रासाठी निश्चित केलेला 12% हा जीएसटीचा दर म्हणजे एकूण कराच्या ओझ्यांचा केवळ एक अंश आहे. बांधकाम क्षेत्र हा एक अपवाद आहे, कारण यात जीएसटी व्यवस्थेत अनेक कर संपलेले नाहीत. सर्व अचल संपत्तीवर राज्य सरकारांनी लावलेले मुद्रांक शुल्क जीएसटीच्या अंमलबजावणीनंतरही कायम राहणार आहे. मुद्रांक शुल्कामुळे बांधकाम क्षेत्रावर पडणारा सरासरी अतिरिक्त बोजा हा अचल संपत्तीच्या मूल्याच्या 5% ते 8% एवढा असतो. दुसरे म्हणजे मुद्रांक शुल्क हे प्रत्येक व्यवहारावर द्यावे लागते. शेवटचे म्हणजे मुद्रांक शुल्क हे राज्य सरकार लावते.”
“जमिनीसाठी सूट देण्यात येत नाही, तोपर्यंत अंतिम ग्राहकांना येणारा खर्च वाढत जाईल. त्यामुळे जीएसटी व्यवस्थेत जमिनीची किंमत शून्य मानून दुहेरा कर आकारणी कमीत कमी करावी, अशी विनंती क्रेडाई सरकारला करत आहे. या महसूलातील घट ही बांधकाम क्षेत्राच्या अन्य उद्योगांवर होणाऱ्या सकारात्मक परिणामातून भरून निघेल आणि ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घरे‘ या उद्दिष्टाला अनुरूप करपद्धत आणल्याबद्दल देशाची जनता धन्यवाद देईल,” असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

