दातृत्व हेच खरे कर्तुत्व : सई ताम्हणकर

Date:

कॅटलिस्ट फाऊंडेशनतर्फे झालेल्या नेत्र तपासणी शिबिरास उदंड प्रतिसाद

पुणे . :- “समाजाप्रती देण्याची भावना जपणारी आपली महान भारतीय संस्कृती आहे. पैसा आणि प्रसिद्धीने माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्यातील दातृत्वाची भावना हीच त्याचे खरे कर्तुत्व सिद्ध करते. अशा दानशूर आणि दायित्व जपणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीमत्वांच्या उपक्रमास प्रोत्साहन देणे हे मी माझे कर्तव्य समजते. ” अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी भावना व्यक्त केल्या. मातोश्री हिराबाई माने यांच्या स्मरणार्थ कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांनी व्हिजन नेक्स्ट फाउंडेशनचे संचालक डॉ. अंबरीश दरक यांच्या सहयोगाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह व नेत्र तपासणी शिबीर एकूण तीन केंद्रात भरवले होते.या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार विजय काळे, भाजप सरचिटणीस उज्वल केसकर, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर, नगरसेवकअविनाश साळवे,  उमेश गायकवाड, विजय शेवाळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, आदित्य माळवे, डॉ. सुरेंद्र पाटील, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, बनी दालमिया, किरण साळी, विनोद सातव आदी उपस्थित होते. दळवी हॉस्पिटल (शिवाजीनगर), राजीव गांधी रुग्णालय (येरवडा) आणि व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन आय हॉस्पिटल (बोपोडी) अशा एकूण तीन केंद्रावर हे शिबीर पार पडले. या शिबिरात सुमारे ५०० हून अधिक गरजू रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.

यावेळी माने म्हणाले की, समाजाकडून आपण खूप काही घेतो, मात्र आपल्यात देण्याची प्रवृत्ती वाढली पाहिजे. ‘मरावे परी, अवयव रुपी उरावे’ ही मानसिकता समाजात रुजली पाहिजे. आज असंख्य रुग्णांना डोळे ,मूत्रपिंड, यकृत यांसारख्या अवयवांची गरज आहे. परंतु, लोकांच्यामध्ये आजही अवयवदानाबद्दल जागरुकता नाही. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. या भावनेने आईचे मरणोत्तर नेत्रदान केले, स्वत:चे देहदान केले. आपल्या कार्यातून गरजू रुग्णांना फायदा व्हावा, या उद्देशाने घेतलेले शिबीर डॉ. दरक यांच्या अमूल्य सहकार्यामुळे यशस्वी झाले. आजच्या तपासणीनंतर ज्या रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळला आहे, त्यांच्यावर आम्ही मोफत शस्त्रक्रिया करणार आहोत.

दरक हे स्वत: सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक आहेत. ८५ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करून त्यांनी वेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. भविष्यातही कॅटलिस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही यासारखे लोकाभिमुख उपक्रम राबवणार आहोत.

दरक म्हणाले की, स्वत:चे वैयक्तिक रुग्णालय बंद करून त्याहून अधिक समर्पकपणे व्हीजन नेक्स्ट फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्र रुग्णांच्या सेवेचा वसा हाती घेतला. नेत्रदानाची चळवळ अधिक व्यापक झाली पाहिजे, हे ओळखून सुनील माने यांनी या कार्याला हातभार लावला. गरजू नेत्र रुग्णांसाठी त्यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून मलाही याचा भाग होता आले याचे समाधान वाटते.

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने ‘कॅटलिस्ट फाऊंडेशनची’ स्थापना झाली असून खासदार गिरीश बापट हे या संस्थेचे पालक आहेत. लष्करी सेवेतून निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल डॉ. डी.बी. शेकटकर या संस्थेचे मेंटॉर आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पहिली वेबसाईट, सांगली पूरग्रस्तांना मदत, हृद्यरोगाची प्राथमिक लक्षणे याविषयी तज्ज्ञांचे व्याख्यान यांसारखे समाजपयोगी उपक्रम फाउंडेशनने राबवले आहेत.

नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी पुढाकार : ताम्हणकर

रक्तदानाइतकेच नेत्रदान ही श्रेष्ठदान आहे. तुम्ही कमावलेला पैसा, संपत्ती नश्वर आहे परंतु, तुमच्या पश्चातही तुमच्या दृष्टीतून ही सुंदर सृष्टी कोणाला तरी अनुभवता येते, ही भावना चिरकाल टिकणारी आहे. सुनील माने आणि डॉ. दरक यांनी राबलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून त्यांच्या प्रेरणेतून मी ही नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात या कार्यात माझा सक्रीय सहभाग असेल, असे सई ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईन गोळ्यांचा मोठा साठा पकडला

इंफाळ आणि गुवाहाटी प्रदेशामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करांच्या टोळीतील...

विद्यार्थ्यांनी उलगडले उपनगरांमधील शहरीकरण

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज...

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याची गरज : सुप्रिया बडवे 

पुणे : अथक परिश्रम, चिकाटी आणि वेगवेगळ्या आघाडय़ांवर एकाच...