पुणे :-निरोगी, संतुलित आणि सुदृढ आरोग्यासाठी धावणे अत्यंत आवश्यक आहे यासाठीच गोयल गंगा फौंडेशनच्यावतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले येत्या २ फेब्रुवारीला बावधन मधील गंगा लेजंड येथे सकाळी ५.३० वाजता स्पर्धेची सुरुवात होणार आहे. मॅरेथॉनची नोंदणी जीआयएस अथ बावधन आणि गोयल गंगा इंटरनैशनल स्कुल वल्लभनगर येथे३१ जानेवारी पर्यंत केली जाणार आहे.यावेळी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबर अनेक कुटुंबे तसेच सोसायट्यांमधील नागरिक, ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.ही स्पर्धा ३ आणि ५ किलोमीटर अशा दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. ‘क्लीनथॉन’ या थीमच्या अंतर्गत स्वच्छ भारत मोहिमेत सहभाग घेऊनत्याविषयी जनजागृती केली यामाध्यमातून केली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून स्वच्छतेचा अवलंब केला पाहिजे याच उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २ फेब्रुवारीला मॅरेथॉनचे आयोजन
Date:

