पुणे :- महापुराने केरळचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्ती मधून बाहेर पडण्यासाठी जगभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे.अशावेळी केरळ मध्ये आलेल्या पूरपरिस्थिचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जास्तीत मदत करण्याचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर क्रेडाई महाराष्ट्राच्या सर्व शहरांतील विकसकांनी एकत्र येऊन सढळ हाताने मदत केली आहे. क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १,३५,४३,५००/- चा धनादेश सुपूर्त केला.
याप्रसंगी क्रेडाई नैशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष रसिक चौहान,राज्य सल्लागार परिषदचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे व मनीष कनेरिया उपस्थित होते.