अमिता फडणीस यांचे आवाहन ; ‘आय पेरेंट्स क्लब’ या फेसबुक पेजचे उद्घाटन
पुणे :- लहान मुलांना शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडून शिकल्यास आपण अधिकाधिक चांगले पालक होऊ असे मत बालरोगतज्ञ डॉ. अमिता फडणीस यांनी व्यक्त केले. बावधन मधील गंगा लेजंड येथे गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने जीजीआयएस अथ अंतर्गत ‘आय पेरेंट्स’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त त्या बोलत होत्या.
‘आय पेरेंट्स’ अंतर्गत ‘आय पेरेंट्स क्लब’ या फेसबुक पेजची सुरुवात करण्यात आली आहे. ज्यात मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य या क्षेत्रात अनेक वर्ष काम करणारे मोहन आगाशे, रक्षित टंडन,भूषण शुक्ला,निर्मला तांबे,अनुपमा देसाई या तज्ञांचे मार्गदर्शन व पालकांच्या अनेक प्रश्नांचे निरसन निशुल्क केले जाणार आहे.
यावेळी गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी, गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता, नगरसेवक किरण दगडे पाटील उपस्थित होते. पालकत्वाचे स्वरूप मुलांच्या वाढीच्या वयानुसार बदलावेच लागते. याचे महत्वही त्यांनी उपस्थित पालकांना पटवून दिले. मुलांना समजून घेताना पालकांना कोणत्या अडचणी येतात, त्यासाठी काय केले पाहिजे. ‘पालक’ हे मुलांचे पहिले गुरु असतात त्यामुळे त्यांचे अनुकरण ते करत असतात म्हणूनच पालकांनी आधी स्वतः अवलंबवाव्यात ज्यातून ते शकू शकतात यातूनच ते भविष्यात उत्तमोत्तम कामगिरी करू शकतात.अशा भावना सोनू गुप्ता यांनी मांडल्या.
आजच्या मुलांमध्ये संयमाची खूप कमी असल्याचे दिसून येते. कोणतीही गोष्ट मिळाली नाही कि त्यांचा चिडचिड सुरू होते. संयम ठेवणारी मुलेच भविष्यात कणखर,आत्मविश्वासी स्वावलंबी आणि संयमी होऊ शकतात. यासाठी त्यांना स्वतःची ओळख करून घ्यायला स्वतःची ओळख करू द्यायला थोडासा वेळ आणि मोकळीक द्या. त्यांच्या अनुभवातून त्यांना शिकायला वेळ द्या. असा सल्ला त्यांनी दिला.