पुणे ता. ३० :- तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तरी यश संपादन करण्यासाठी ‘ग्राहक देवो भव:‘ मूलमंत्र जपता आला पाहिजे. याशिवाय कामातमेहनत, चिकाटी,सातत्य, दूरदृष्टी, नियोजन आणि आत्मविश्वास या गोष्टी आत्मसात केल्यास यश तुमचेच आहे. असे मत संपूर्ण देशात मुंबईच्या डब्बेवाल्यांची वेगळी ओळख निर्माण करणारे डॉ. पवन अग्रवाल यांनी व्यक्त केले.
राउंड टेबल इंडिया यांच्या वतीने ‘लेट्स टॉक’ या मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राउंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय सचिव पियुष डागा, पुणे राऊंड टेबल १५ चे अध्यक्ष देवेश जतिया, राउंड टेबल इंडियाचे अन्य सदस्य श्रुती बोरा,कपिल शाह यावेळी उपस्थित होते.
डबेवाल्यांकडून अवलंबिल्या जाणाऱ्या कोडिंग सिस्टीमची, त्यांच्या शिस्तबद्ध जीवनाची आणि त्यांच्या या मेहनतीमुळे जगभर झालेल्या कौतुकाची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
ते पुढे म्हणाले कि, ग्राहकांची संख्या सतत कशी वाढत ठेवावी,त्यांना कायम आनंदीकसं ठेवून यातून त्यांचे समाधान जपणे आवश्यक आहे. तसेच मानवसेवेचे व्रत जपल्यामुळे हा व्यवसाय यशस्वीपणे सुरू असल्याच्या भावनाही त्यांनी मांडल्या.देवेश जतिया यांनी प्रास्ताविक केले तर सचिव पियुष डागा यांनी आभार प्रदर्शन केले.

