पुणे-राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारचे विविध विभाग,महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मरमेशन फाऊडेंशन आणि विविध सामाजिक संस्था, कंपन्या व व व्यक्तीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६१ सामंजस्य करार करण्यात आले.
महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मरमेशन फाऊडेंशनच्यावतीने वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करण्यासाठी संस्थाबरोबर करार करण्यात आले. महापरिवर्तनच्या माध्यमातून गावांच्या विकासासाठी १६ गावांमध्ये पीएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जाणार आहे. या कराराच्या माध्यमातूनच मॉडेल गावे निवडली जाणार आहेत. या गावामध्ये देशातील अधिक उत्तम सेवा-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित्तीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पणनमंत्री राम शिंदे, महादेव जानकर, आरोग्यमंत्री दीपक सावंत, मुख्य सचिव भूषण गगराणी, अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) व डीलिवरिंग चेंज फाऊडेंशन (डीसीएफ) यांच्यामध्ये प्राधिकरणातील म्हाळुंगे-माण, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, मांगडेवाडी, भिलारेवाडी,गुजरनिंबाळकरवाडी, पिसोळी, येवलेवाडी, वडाचीवाडी, औताड हांडेवाडी, होळकरवाडी, उरुळीदेवाची,
फुरसुंगी, वडकी, मांजरी खुर्द-कोलवडी, आव्हाळवाडी-वाघोली इत्यादी गावांमध्ये सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार ३ महिन्यांसाठी ०१ जुलै २०१८ ते३० सप्टेंबर २०१८ या कालावधीपर्यंत करण्यात आलेला आहे.डीसीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत बाली व पीएमआरडीएच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर यांच्यामध्ये सामंजस्य करार पार पडला. महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले की, पीएमआरडीए हद्दीतील ग्रामीण भागांचा विकास नागरिकांच्या सहभागातून केला जाणार आहे. सर्व गावांमध्ये पीएमआरडीएच्या माध्यमातून गावागावांत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच ग्रामस्थांच्या माहितीसाठी
कार्यशाळा, सेमिनार राबिवले जाणार आहेत.
पीएमआरडीए व डीसीएफ यांच्यामध्ये १६ गावांच्या विकासासाठी सामंजस्य करार
Date: