Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पारदर्शक कारभारासाठी महा-रेराचा वापर करा – डॉ. प्रभू

Date:

पुणे – बांधकाम व्यवसाह या दुसऱ्या क्रमांकावरील व्यवसाय आहे जिथे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध होतो. देशाच्या एकूण उत्पन्नात ८ ते ९ टक्के याच व्यवसायाचा वाटा आहे. परंतु, ग्राहक आता खूप जागृत झाला आहे. त्यांच्याकडे पैसैही आहेत पण फसवणूक होऊ नये याची त्यांना भिती असते. यासाठी विकसकांनी आपला संपुर्ण कारभार पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (RERA) कायद्याच्या नियमांचे पालन करावे. असे मत महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी व्यक्त केले.

विकसकांना रेरा कायद्याच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी क्रेडाई महराष्ट्राच्या वतीने काल क्रेडाई पुणे मेट्रोच्या ऑडीटोरियम मध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विकसकांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रभू बोलत होते.

यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्रा स्टेट अॅडव्हायझरी कौन्सिलचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई महाराष्ट्र रेरा कमिटीचे संयोजक अखील अग्रवाल, आरती हरभजनका, ज्ञानेश्वर हाडतरे, रनजीत नाईकनवरे, एफ.डी. जाधव आणि मोठ्या संख्येने विकसक उपस्थित होते.

डॉ. प्रभू म्हणाले, कायदे खुप येतात पण त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही. या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याचावर विचार करण्यात आला आहे. या कायद्या अंतर्गत आपल्या प्रकल्पाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. सर्व साधारण पणे नोंदणी (रजिस्ट्रेशन) झाले की आपले काम संपले असे होत नाही. यानंतर खरे काम सुरू होतो. ग्राहकांचा विश्वास वाढावा यासाठी विकासकांनी रेरा नोंदणीचा लोगो वापरण्यास हरकत नाही. यामुळे आपल्या प्रकल्पाची संपुर्ण अधिकृत माहिती मिळेल, आणि रेरा लोगोमुळे त्यांचा विश्वासही आणखी वाढेल. नोंदणी केल्यानंतर प्रत्येक तीन महिन्यांना आपल्या प्रकल्पाचे पुर्ण झालेले काम, केलेल्या सुधारणा, ग्राहकांनी केलेल्या नोंदी आदी भरणे जरूरीचे आहे. यामुळे ग्राहकाला आपल्या प्रकल्पाची माहिती घरबसल्या मिळते. यातून ग्राहक आणि विकसक यांच्यामध्ये निर्माण होणारे गैरसमज दूर होतात. ग्राहकालाही संपुर्ण माहिती दिली असल्यामुळे तो तक्रार करू शकत नाही. त्यामुळे या कायद्याकेड दडपण म्हणून पाहू नये. यामुळे कोणालाही घाबरायची गरज नाही.

आरती हरभंजनका यांनी रेरा नोदनी प्रक्रियेची संपुर्ण माहिती सादरीकरणाद्वारे सर्वांना करून दिली. रेरा नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अचडणी कशा प्रकारे सोडवायच्या, अर्ज कसा भरायचा आदी प्रकारीची सविस्तर माहिती दिली.

या कार्यशाळेमध्ये अनेक विकसकांनी मोकळेपणाने आपले प्रश्न मांडले त्यांच्या संपुर्ण प्रश्नांची उत्तरे तितक्याच मोकळ्या पणाने देण्यात आली.

कन्सीलेशन मध्ये पुणे एक नंबरला

ग्राहक आणि विकसक यांच्यामधील सलोखा वाढावा यासाठी या कन्सीलेशन फोरमची सुरूवात करण्यात आली आहे. याला पुण्यातील लोकांचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्यो दोघांच्याही सहमतीने तक्रारीचे निवारण केले जाते. कन्सीलेशन मध्ये पुणे एक नंबरला आहे.

या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून करण्यात आले होते. क्रेडाई फेसबूक पेज वरून हे प्रक्षेपण करण्यात आले. यामुळे भंडारा, परभणी, चंद्रपुर, रत्नागिरी, मालवण, सावंतवाडी आदी ठिकाणच्या विकासकांना याचा लाभ घेतला .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कंत्राटदारांच्या प्रश्नावर संसदेच्या अधिवेशनानंतर पुण्यात बैठक

शरद पवार यांचे सुनील माने यांना आश्वासननवी दिल्ली :...

पुण्यातील उत्तर प्रदेशीय भामट्या रिक्षाचालकाला दिल्लीत जाऊन पकडला..

बाणेरमध्ये एकाला रिक्षाने उडवलं, उपचाराच्या बहाण्याने नेलं ,पण ...

विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी मागणी, ७ विधेयके सादर

नागपूर - विधानसभेत 75 हजार 286 कोटी रुपयांची पुरवणी...

सातव्या दिवशीही 200+ उड्डाणे रद्द:सर्वोच्च न्यायालयाचाही याचिकेवर सुनावणीस नकार

मुंबई- देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण सोमवारी...