पुणे :- पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून सध्याचा ढासळता समतोल लक्षात घेता जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षलागवड करून त्याच्या संवर्धनाची आवश्यकता आहे. असे मत गोयल गंगा फौंडेशनच्या विश्वस्त गीता गोयल यांनी केले.
गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गंगा लेजंड बावधन आणि गंगाधाम टॉवर्स जवळील परिसरात आज स्वच्छता,सुशोभीकरण आणि वृक्षारोपणाच्या उपक्रमास सुरुवात झाली. या दोन्ही प्रकल्पांच्या ठिकाणी या उपक्रमांतर्गत येत्या वर्षभरात ५ हजारांहून अधिक झाडे लावली जाणार असल्याची माहिती गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या कि,पर्यावरण आणि त्याच्या संरक्षणा प्रतीची प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखल्यास पर्यावरणासोबतच आपणा सर्वांचेही जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचे जतन व संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी उचलणे अत्यावश्यक आहे. आपण केवळ आपल्या कुटुंबाचा विचार न करता भावी पिढीसाठी सामाजिक योगदान म्हणून पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची स्वत:पासून सुरुवात करा असे आव्हान देखील गीता गोयल यांनी यावेळी केले.
यावेळी नगरसेवक किरण दगडे पाटील,संबंधित प्रकल्पाच्या तांत्रिक विभागात काम करणारे निखील अत्रे,कुमार बर्डे, एस. के. मिश्रा,प्रदीप सोहनी,विकास गारडे,अंकित गोयल,उद्य पाटील याप्रसंगी उपस्थित होते.