पुणे :- बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. पिंपरीतील गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के लागला असून येथील विद्यार्थांनी उत्कृष्ठ यश संपादन केले असून सांची थावणी हिला सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
एकूण डिस्टिंगक्शन ४४% असून ८७ विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थी विज्ञान आणि २६ वाणिज्य विभागातून आहेत. यातील १० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. विज्ञान शाखेतील
सांची थावणी (९५.४),अक्षय मेनन (९४.२),आरुषी दरड आणि रजत दुबे यांना ९२. ८ तर अनिकेत कुमार ९१.४,गौरी मेनन ९१.४,चिराग वोहरा (९१. २) रिषभ गोयल ९०.२ वाणिज्य शाखेतील मानसी गुप्ता(९५), श्रेया जावळी (८४.४),सेजल अग्रवाल (८३.६) टक्के मिळाले आहेत. याबद्दल मुख्याध्यपिका भारती भागवाणी यांनी शाळेच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

