विकासाला चालना देणारा आणि उभ्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प .अशी प्रतिक्रिया अन्न नागरीपुरवठा व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेती, स्मार्टसिटी, नागरी आरोग्य, रस्ते व गृहखाते या विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. शिक्षणशुल्काची मर्यादा वाढवून त्यांनी विद्यावेतनातही वाढ केली आहे. न्यायालय, जलवाहतुक, कृषिपंप, हस्तकला उद्योग यासह कुपोषण, मल्टीस्पेशॅलिटी रूग्णालये, शेतकरी सन्मान योजना, सूक्ष्म सिंचन अशा सर्व विषयांना आर्थिक बळ देण्याचे फार मोठे काम मनगुंटीवार यांनी केले आहे.या अर्थसंकल्पातील एक लाख लोकांना रोजगार, वनशेती, सेन्द्रीय शेती, बाजार समित्यांसाठी ई ट्रेडिंग, मातीकला मंडळ, दिव्यांगांना अर्थसहाय्य इत्यादी योजनांचे जनतेकडून स्वागत होईल. याची मला खात्री आहे. नागरी आरोग्य अभियान. शेतमाल प्रक्रिया. एस टी स्टॅण्डची डागडुजी, नवे औष्णिक प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन,गर्भवती महिलांना मदत, तेरा कोटी वृक्षलागवड, पर्यटन विकास ही
या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये जनसामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देणारी आहेत. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४ हजार ७९७ कोटी रुपयांची केलेलीू तरतूद स्वागतार्ह आहे. लहुजी वस्ताद यांचे पुणे येथे स्मारक उभे करणार असल्याचे या अर्थसंकल्पातून घोषित केले आहे. याबद्दल पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचा आभारी आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला नेमकी दिशा देणारा आणि भारतीय जनता पक्षाला वचनपूर्तीकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मनगुंटीवार यांचे अभिनंदन.

