गोयल गंगा फौंडेशनकडून कामगारांसाठी सुरक्षा सप्ताह
पुणे – गोयल गंगा फौंडेशनकडून कामगारांसाठी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होत. बावधन मधील गंगालेजंड येथे हे करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ मार्च ते १० मार्च या दरम्यान साजरा केला जातो. कामगार हा कुठल्याही बांधकाम प्रकल्पाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्य प्राधान्य दिले पाहिजे असे मत गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल यांनी व्यक्त केले.
कामगारांमुळेच बांधकाम व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. अनेक वेळेला त्याला उंचावर काम करावे लागते. पुरेशी काळजी न घेतल्याने काही वेळेला अपघात होतात, प्रसंगी यामुळे कामगारांना जीव ही गमवावा लागतो. हे व्यावसायिकांना निश्चितच भूषणावह नाही. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कामगारांनी ही काळजी घेऊन काम केले पाहिजे. यासाठी अनेक सुरक्षा उपकरणे उपलब्ध आहेत. याचा वापर केला पाहिजे तसेच ही उपकरणे वापरण्यासंदर्भात कामगारांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. यासाठी हा सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. गोयल गंगा इंडिया प्रा.लि ने ही नेहमी कामगारांच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य दिल आहे. कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल गोयल गंगा इंडिया प्रा.लि नेहमी सजग असतो. त्यामुळे कामगारांनी काम करताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे सुरक्षा घेतली पाहिजे याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बावधन मधील गंगा लेजंड येथे याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी मजुरांना या सुरक्षेसंदर्भातील बारकावेही सांगण्यात आले. उंचावर काम करताना हेल्मेट व सेफ्टी बेल्टचा वापराचे महत्वही पटवून दिले. बऱ्याच वेळा निष्काळजीपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे अपघात होतात मौल्यवान जीवनाचे नुकसान होते. त्यामुळे स्वत: सुरक्षा उपकरणांचा वापर करावा व इतरांनाही अशा सुरक्षा उपायांचा वापर करण्यास प्रेरित करावे असे यावेळी कामगारांना सांगण्यात आले. कामगारांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याची शपथ यावेळी घेतली.कंत्राटदार, सुपरवायझर आणि मजुरांनी सुरक्षेच्या आठवड्यात भाग घेतला.
मुख्य अभियंता कुमार बर्डे व प्रोजेक्ट मैनेजर वीरेन कुसुरकर याप्रसंगी उपस्थित होते


