पुणे-
‘चांदणी चौकातील बीडीपीच्या पन्नास एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या निर्णयावर आज मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले . शिवसृष्टीसाठी मी आग्रही होतो. याबाबत तोडगा काढण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली होती. यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आज या प्रकल्पाची घोषणा केली. त्यासाठी निधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता वनाज- रामवाडी मेट्रोच्या कामालाही गती मिळणारं आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनातील दोन महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळे दूर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढल्याबद्दल यांचे खास अभिनंदन.’
– गिरीश बापट( पालकमंत्री, पुणे)