पुणे :- मतदान हा राज्यघटनेने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे; परंतु या अधिकाराचा वापर करण्याविषयी मोठी उदासिनता आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गोयल गंगा फाउंडेशनने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला. शनिवारी गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रॅलीच्या माध्यमातून “लोकशाहीचा हक्क बजावा, मतदान करा” असा संदेश नागरिकांना दिला. यात १०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागात जाऊन त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.’युअर वोट,युअर व्हॉईस’,’युअर वोट,युअर फ्युचर’, वोट फॉर बेटर इंडिया’ अशा घोषणा करीत त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले.
“मतदानाची टक्केवारी वाढणे अत्यंत आवश्यक असून यासाठी केवळ शासनच नाही तर प्रत्येकानेच पुढे आले पाहिजे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी पुढे यावे यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे.” असे विश्वस्त सोनू गुप्ता त्यांनी सांगितले.
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नका, असे आवाहन मतदारांना करून, मतांची टक्केवारी वाढावी, या हेतूने गोयल गंगा फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम अनुकरणीय आहे.

