पुणे-आगामी निवडणूक व्यक्ती केंद्रीत होणार नसून दोन विचारधारांमध्ये ही निवडणूक होणार आहे, देशाने ठरवायचे आहे ,म. गांधी ,पंडित नेहरूंची विचारधारा हवी आहे कि ,हेडगेवार ,गोळवलकर ,सावरकरांची विचारधारा हवी आहे ,एमआयएम चे ओवेसी आणि भाजपा हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत , लोकपाल साठी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली भाजपने आंदोलन केले होते असे हि विधान करत आता लोकपालच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन व्हावे या मताशी मी सहमत असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष ,माजी मंत्री ,रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी ,अभय छाजेड ,नीता परदेशी,लता राजगुरू,विक्रम खन्ना आदी यावेळी उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठलाला अभिषेकाची परंपरा राहिली आहे. मुख्यमंत्री विठ्ठलाप्रती समर्पित आहेत तर त्यांनी या समर्पित भावनेने पंढरपूरला जायला हवे होते, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले. जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे. खुद्द मित्र पक्ष साथ सोडत आहेत, हा देखील सरकारवरील अविश्वासच आहे. केंद्र सरकार मधील मंत्र्यांनाही बोलण्याची मुभा नाही. “ना खाऊंगा ना खाने दुंगा’, म्हणणारे मोदी राफेल विमान खरेदीबाबत माहिती देण्यास तयार नाहीत. यासाठी करारातील माहिती गुप्त असल्याचे कारण सांगितले जात आहे. परंतु फ्रान्सच्या राफेल कंपनीने वार्षिक ताळेबंदात ही माहिती उघड केली आहे. त्यामुळे मोदींचा खरा चेहरा उघड झाला आहे, अशी टीका सिंह यांनी दिली.
कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय परस्परच 36 विमानाच्या खरेदीचे आदेश दिले. त्यामध्ये 18 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. काफिला टनेलच्या बाबतीही एकाच कंपनीचे 10 हजार 500 कोटी रुपयांची निविदा आली होती. त्या कंपनीला काम द्यायचे ठरत होते. हे चुकीचे असल्याचे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पुन्हा निविदा काढण्यात आली. त्यानंतर ते काम 4 हजार 800 कोटी रुपयांत झाले, असा दावा सिंह यांनी केला.
लोकपाल कायदा मंजूर झाला; परंतु त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मुळात पंतप्रधानाचाच त्याला विरोध आहे. भाजप धार्मिक हिंसा भडकवून राजकारण करत आहे. राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात 100 मंदिरे पाडण्यात येत आहेत. परंतु त्या विषयी ते काही बोलत नाहीत. धर्माचा वापर केवळ समाजातील तेढ वाढवून राजकारणासाठी केला जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर मांडलेली भूमिका आणि मोदी यांची गळाभेट घेऊन घातलेला सहिष्णुतेचा पायंडा योग्यच आहे, असे सांगत राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबाही दिला.
पहा आणि ऐका नेमके दिग्विजयसिंग यांनी काय म्हटले आहे ….त्यांच्याच शब्दात ….