Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ब्लॅकमेल करण्यासाठी कुंडल्या ठेवता काय ? पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना सवाल (व्हिडीओ)

Date:

पुणे—जर तुमच्याकडे कुंडल्या आहेत तर कारवाई करणे अपेक्षित आहे,पण निव्वळ माझ्या कडे कुंडल्या आहेत अशा धमक्या देणे म्हणजे ब्लॅकमेल करण्यासारखे आहे अणे असे प्रकार पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री करत आहेत हि बाब अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय असल्याचे आज काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे ,
स्व. इंदिरा गांधी यांनी सुरू केलेली गरीबी हटाव योजना याला कुठलीही कालमर्यादा नव्हती.कॉँग्रेसच्याच किमान उत्पन्न हमी योजननेच्या(न्याय योजना) माध्यमातून गरीबी विरुद्धची अंतिम लढाई जाईल आणि देशातील गरीबी दूर होईल असा विश्वास
चव्हाण यांनी व्यक्त केला. न्याय योजना ही क्रांतिकारी योजना असून तो कॉँग्रेसच्या जाहीरनाम्याचा मूळ गाभा आहे असेही त्यांनी संगितले.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या  प्रचारार्थ ते येथे आले तेव्हा कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा जाहीरनामा यावर त्यांनी सडकूनटीका केली. कोंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे लोकसभा मतदार संघाचे कोंग्रेस- राष्ट्रवादीआघाडीचे उमेदवार मोहन जोशी दीप्ती चवधरी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, कमाल व्यवहारे , श्रीकांत शिरोळे, नीता रजपूत आदि यावेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, न्याय योजनेसाठी किती पैसे लागतील याचे सर्व आकलन झाले आहे. देशात टप्प्याटप्प्याने ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी ३ लाख ६० हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. सुरूवातीला १० टक्के लोकांसाठी १ लाख ८० हजार कोटी रुपये लागतील. या योजनेच्या लाभार्थीची निवड काशी करायची हे पुढे ठरवले जाईल. त्या आम्ही करू. या योजनेसाठी इतर लाभांच्या कुठल्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत. जीसटी,डायरेक्ट टॅक्स यामुळे करामध्ये चांगली वाढ होईल. त्यातून या योजनेचे व्यवस्थित नियोजन होईल. त्यामुळे या योजनेसाठी कुठून पैसे
आणणार याची विरोधकांनी चिंता करण्याची गरज नाही.
काँग्रेस पक्षचा जाहीरनामा हा माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केला आहे. हा जाहीरनामा एकूण ५५ पानाचा असून ४२ उपसमित्या त्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. समन्वयक उपसमन्वयक यांच्या माध्यमातून देशातील १२१ ठिकाणी विविध घटकांशी ,संघटनांशी चर्चा करून आणि ५५ लोकसभा मतदार संघात जावून चर्चा करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हा कोंग्रेसचा नाही तर जनतेचा जाहीरनामा आहे असे त्यांनी नमूद केले.
इंदिरा गांधींनी गरीबी हटावची घोषणा केली तेचा देशातील ७८ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली होती.त्यांनी गरीबी हटावसाठी कुठलीहे कालमर्यादा संगीतलेली नव्हती. त्यांनी बँकांचे राष्ट्रियकरण करूनत्यातून क्रेडिट पॉलिसी आणली. २० कलमी कार्यक्रम राबविला. अन्न सुरक्षा कडा, मनरेगा या माध्यमातून २००४ ते २०११ पर्यन्त देशातील १४ कोटी जनता दारिद्र्य रेषेच्यावर आली. त्यामुळे न्याययोजना ही दारिद्र्याविरुद्ची शेवटची लढाई आहे असे ते म्हणाले.

भाजपवर टीका करताना चव्हाण म्हणाले,निवडणुका आल्या की त्यांना राम मंदिराचा मुद्दा आठवतो.हा मुद्दा पुढे आणायचा आणि पुढे काहीच कारचे नाही. परंतु एका गोष्टीवर ते निवडणूक लढवू शकत  नाहीत. आता ही निवडणूक मुद्यांवर गेली आहे. भाजप ही निवडणूक व्यक्तिकेन्द्रित करू पाहत आहे. आमच्या नेत्यांवर व्यक्तीगत टीका करायची, स्वत:बद्दल बोलायचे नाही. परंतु त्यांनी मुद्यावर बोलावे, गेल्या पाच वर्षात काय केले? किती आश्वासने पूर्ण केली यावर बोलले पाहिजे.
आमच्या जाहीरनाम्या वर त्यांनी बोलावे. परंतु मोदी मुद्दाम जनतेचे लक्ष विचलित करत आहेत कारण
त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यांच्या जाहीरनाम्यातील किसान सन्मान योजना, शेतकरी उत्पन्न दुप्पट कसं करणार, योजना बोगस आहे, उत्पन्न दुप्पट होण्यासाठी १८ ते २० टक्के विकासदर हवा आहे. महागाई नियंत्रण साठी
भाजपनं नेमकं काय केलं? चुकीचं आयात धोरण राबविले. जेव्हा शेतीमालाला चांगला दर मिळेल तेव्हा निर्यात बंद करायची असे धोरण त्यांनी राबविले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या. भाजपला जाहीरनामा सुद्धा म्हणता आलं नाही, संकल्प पत्र म्हणावं लागलं अशी टीका त्यांनी केली.
कुठलीही व्यक्ति नरेंद्र मोदींचे खरे स्वरूप उघड करत असेल त्यांचा पर्दाफाश करत असेल आणि भाजपचा खोटेपणा लोकांच्या समोर आणला तर ते स्वागतार्ह आहे असे संगत त्यांनी राज ठाकरेंचीपाठराखण केली. त्याचे मतांमध्ये किती रूपांतर होईल हे निवडणुकीनंतरच समजेल असे त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...

बांग्लादेशी राज्यात आणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या जवळचे ड्रग्सचे कारखाने चालवत आहेत.

ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी...