सचिन तावरे यांचा समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Date:

पुणे- पर्वती भागातील शिवसेनेचे सचिन तावरे यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला . काँग्रेस भवनात दुपारी झालेल्या खास कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन तावरे यांनी आपल्या समर्थकांसह फटाक्यांच्या निनादात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते, आमदार शरद रणपिसे,  पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस -मित्र पक्ष आणि आघाडीचे उमेदवार मोहन जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, सचिन तावरे यांच्यासारखा उमदा, तरुण कार्यकर्ता काँग्रेसमध्ये परतल्याबद्द्दल आनंद व्यक्त केला.  मोदी यांचे ढोंगी सरकार हटवून काँग्रेसला सर्वसामान्य माणसांचे राज्य आणावयाचे आहे त्यामुळेच या निवडणुकीत मोहन जोशी यांच्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी मोहन जोशी यांनी प्रास्ताविक करताना  शिवसेनेचे  सचिन तावरे यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा करून त्यांचे काँग्रेसमध्ये सहर्ष स्वागत केले. याप्रसंगी आपल्या  समर्थकांच्या उपस्थितीत  भाषण करताना सचिन तावरे म्हणाले की, गेली काही वर्षे मी दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी मी मनाने काँग्रेसमध्येच होतो. मी माझी वाट चुकलो होतो. एखादे मूल आईपासून जसे दुरावते आणि आई दिसली की लगेच ते तिला बिलगते तसे माझेही झाले होते.
काँग्रेस ही माझी आई आहे म्हणून मी आज माझ्याच घरी आनंदाने परतलो आहे. काँग्रेस पक्षाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी मी शपथ घेऊनच या पक्षात पुन्हा आलो आहे आणि प्रत्येक दिवसागणिक काँग्रेसची सर्वांगीण प्रगती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे जाहीर करून तावरे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत मोहनदादा विजयी व्हावेत या एकाच प्रामाणिक इच्छेपोटी
मी काँग्रेसमध्ये आलो आणि आता मतदानाला दिवस कमी असले तरी मी आणि माझे कार्यकर्ते रात्रंदिवस कठोर मेहनत करून मोहन जोशी यांचा विजय सार्थ करून दाखवू असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेतही सचिन तावरे यांनी आपल्या घरवापसीबाबतआनंद व्यक्त करून काँग्रेस पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक विचार आहे आणि हा विचार कोणी काहीही केले तरी मुळीच नष्ट होणार नाही असे ठामपणे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...