पुण्याचा चौकीदार झोपलेलाच- मोहन जोशी

Date:

पुणे-पुण्याच्या वाट्याला येऊ घातलेले अनेक महत्वाचे विकास प्रकल्प केवळ पुण्याला कोणी वाली
नाही म्हणून पुण्याच्या बाहेर गेले आहेत. पुण्याचा चौकीदार झोपल्यामुळेच पुणे शहराच्या
विकासाची अशी दुर्दशा झाली आहे अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे
उमेदवार मोहन जोशी यांनी केली आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघातील पदयात्रेच्या
समारोप प्रसंगी बोलताना ते म्हणाले की पुण्यात व्यवस्थापनशास्त्राची ‘आयआयएम’ व
‘आयआयटी’ या संस्था येणार होत्या पुण्यात विधी विद्यापीठ होणार होते पण हे प्रकल्प बाहेर
गेले उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होणे अपेक्षित होते तसेच एम्सच्या धर्तीवर पुण्यात मोठा
प्रकल्प अपेक्षित होता पण गेल्या पाच वर्षात चौकीदार झोपल्यामुळे पुण्यात हे प्रकल्प मार्गी लागू
शकले नाहीत अशी टीका जोशी यांनी यावेळी केली.
झोपी गेलेल्या चौकीदार याच्याबाबतीत आणखी एक उदाहरण देताना मोहन जोशी म्हणाले की पुण्याच्या
नदी सुधारणेसाठी ‘जायका प्रकल्प’ मंजूर झाल्याची बाब भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या
कडून आम्ही ऐकली पण आज पाच वर्षे झाली पुण्यातला जायका प्रकल्प अजिबात मार्गी लागू शकला
नाही किंबहुना आता तो पुण्याच्या हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा झोपी गेलेल्या
चौकीदाराच्या हातात पुण्याला सोपवणे नुकसानकारक ठरणार आहे याची जाण पुणेकरांना आहे. त्यामुळे या
चौकीदाराची गच्छंती आता अटळ आहे. असे ते म्हणाले.


कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षांचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या
प्रचारार्थ कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास मोठा
प्रतिसाद मिळाला. खिलारेवाडी येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. पुढे मेहंदळे गॅरेज, दीनानाथ मंगेशकर
हॉस्पिटल, शा.म. मुखर्जी उद्यान,कमिन्स कंपनी, कर्नाटक हायस्कूल, गणेशनगर ओटा वसाहत, संजय
गांधी वसाहत, निंबाळकर बाग, करिश्मा चौक, मयूर कॉलनी , गुजरात कॉलनी, मोकाटे तलाव, संगीता
हॉटेल चौक, सुतार दवाखाना, शिवाजी पुतळा, म्हसोबा मंदिर, कोथरूड बस स्टँड, गांधीभवन चौक, लक्ष्मी
नगर, गोसावी वस्ती असा मार्गक्रमण करत किशोर कांबळे यांच्या कार्यालयजवळ या प्रचारफेरीचा समारोप
झाला.
घोषणांचा जल्लोष करत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी कवाडेगट शेतकरी कामगार पक्ष

आणि शेतकरी संघटनेचे हातात झेंडे घेऊन प्रचार फेरीमध्ये सहभागी झालेलेकार्यकर्ते अशा वातावरणात

निघालेल्या या प्रचार फेरीचे चौकाचौकात, वस्त्यांमध्ये,रस्त्यावर फटाके वाजवून, मोहन जोशी यांना पुष्पहार घालून

स्वागत करत होते.
मोहन जोशी म्हणाले, काँग्रेसने गरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा कायदा केला. त्या माध्यमातून अत्यंत अल्प
किमतीत गहू, तांदूळ, तुरडाळ रेशनवर उपलब्ध करून दिली. मात्र, मोदी सरकारने या गरिबांच्या हक्कावर
गदा आणत गरिबांच्या जनतेच्या तोंडचा घास पळवला आहे. त्यामुळे मागच्या वेळी केलेली चूक पुन्हा न
करता या सरकारला सत्तेवरून घालवण्याची वेळ आता आली आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना वार्षिक ७२०००/- उत्पन्नाची हमी देणारी ‘न्याय’
योजना घोषित केली आहे. त्या माध्यमातून देशातील गरिबी दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रचार फेरीमध्ये शिवा मंत्री, उमेश कंधारे, राजाभाऊ साठे, प्रशांत वेलणकर, किशोर मारणे, किशोर कांबळे
स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, कालिंदी गोडांबे, निलेश सुतार, शिवाजी पाडळे,अर्चना चंदनशिवे,
प्राजक्ता दुधाने, महेश विचारे, अण्णा गोसावी, दिनेश सुतार, राजू मगर, सोनाली मगर, अजित ढोकळ,
उर्मिला गायकवाड, राहूल गायकवाड, संदीप मोकाटे यांसह शेकडो महिला व कार्यकर्ते या प्रचार फेरीत
सहभागी झाले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...