श्रीरामाच्या पराक्रमाचे स्मरण करून भाजपरूपी रावणाचा पराभव करू या – मोहन जोशी

Date:

पुणे – आज राम नवमी. श्रीरामांचा जन्म दिवसाच्या सर्व मतदारांना शुभेच्छा देतो. रामाच्या पराक्रमाचे स्मरण करून या निवडणुकीत आपण सर्वजण भाजपच्या रावणाचा मतदारानातून पराभव करू. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी शेवटच्या आठवड्यात सतर्क राहून मतदारांशी सतत संपर्क ठेवून देशात शांतता रहाण्यासाठी, देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा असे आवाहन, असे आव्हान पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – पिपल्स रिपब्लीकन आघाडी, शेकाप आणि मित्र पक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज संवाद यात्रेच्या सांगता सभेत केले.
मोहन जोशी पुढे म्हणाले, देशात गेल्या पाच वर्षात काय परिस्थिती झाली आहे याची सर्वांनाच जाणिव आहे. मोदी सरकारच्या एकाधिकार शाहीचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला सहन करावा लागला आणि लागत आहे. या सर्वाना त्रासातून मुक्त करण्यासाठीच या रावणाचा पराभव करण्यासाठी आपण सिद्ध झालो आहोत. आज जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्याचा आठवण करून देत त्या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, वेगवेगळ्या निर्णयातून देशातील समाजात, जातीत तेढ निर्माण कऱण्याचे काम या सरकारने केले आहे. सामाजिक व धार्मिक सलोख राखण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठीची ही निवडणूक आहे. त्यासाठी सर्वांनीच दिवसरात्र एक करून काम करावे असे आवाहन केले. विनोद मथुरावाला यांनी १९७१ च्या विजयाची आठवण करून देतानाच या विजयाचे श्रेय घेत त्यावेळी इंदिराजी गांधी यांनी मत मागितली नव्हती याचे स्मरण करून दिले. पण
आज सेनेचे विजयाचा उपयोग त्यासाठी केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन मथुरावाला यांनी केले. माजी महापौर प्रशांत जगताप यांनी वानवडी हा परिसर कॉस्मोपॉलिटन घोरपडी बाजार ते वानवडी बाजार या परिसरातून सर्वाधिक मताधिक्य मोहन जोशी यांना देऊ असे सांगितले.


या संवादयात्रेत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे जेष्ठ नगरसेवक विनोद मथुरावाला, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक बंडू गायकवाड, नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेविका सुरेखा कवडे, काँग्रेस सेवादलाचे शहर अध्यक्ष प्रकाश पवार, शिवाजी केदारी, रत्नप्रभा जगताप, अभिजीत शिवरकर, काँग्रेसचे कॅन्टोन्मेंट ब्लॉकचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष भोला शिव, काका पवार, संकेत कवडे, विशाल कवडे, चंद्रकांत कवडे, शांताराम कवडे, संतोष कवडे, हर्षद बोराटे, पूनम बोराटे, भरत धर्मावत, शंभू जांभूळकर, रेखा जांभूळकर, सविता गिरमे, कविता शिवरकर, साहील केदारी, अमीन शेख, संजय कवडे, जमीर सैय्यद, रवी बागशीव, केविन नयनमल, राजाभाऊ चव्हाण, रॉबर्ट डेव्हीड, नईम शेख, अजय गणेशकर, राजू नायडू, गोपी पिल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने
कार्यकर्ते आणि पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
घोडपडी बाजारमधील मधील अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाने मोहन जोशी यांनी संवाद यात्रेला प्रारंभ केला. घोरपडी गावातील जयहिंद चौकातील वस्तीत जाऊन तेथील मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर श्रावस्ती, निगडेनगर, बी. टी. कवडे रोड, सोलापूर रोड, फातिमानगर, संविधान चौक, केदारीनगरमधून वानवडीतील मतदारांशी संवाद साधल्यावर वानवडी बाजारमधील वॉर्ड क्रमांक सहामध्ये छोट्या सभेने संवाद यात्रेची सांगता झाली.
घोरपडी बाजारपासून ते वानवडी बाजारपर्यंतच्या या संवाद यात्रेच्या मार्गात अनेक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या समारंभाची जोरदार तयारी सुरू असल्याचे बघायला मिळाले. या निमित्ताने या कार्यकर्त्यांशीही संवाद साधण्याची संधी मोहन जोशी यांनी साधली. प्रत्येक भागात तेथील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे खांबाखांबावर लावून वातावरण निर्मिती केली होती. तसेच प्रत्येक ठिकाणी हातात झेंडे घेतलेले कार्यकर्ते उमेदवार मोहन जोशी यांच्या स्वागताला उभे होते. उमेदवारांच्या रॅलीचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात येत होते. सुरूवातीला बंडू गायकवाड यांनी तर नंतर माजी नगरसेविका सुरेखा कवडे यांनी त्यांच्या घरी नेऊन उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे निवासस्थानही याच मार्गवर असल्याने तेथे काही वेळ विश्रांती झाली. या विश्रांतीनेतर पुन्हा एकदा नव्या जोशात सर्व कार्यकर्ते फातिमानगरच्या दिशेने निघाले. वानवडी चौकात प्रशांत जगताप व
त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शिवाजी केदारी यांनी केदारीनगरमध्ये संवाद यात्रेचे स्वागत केले. मतदारांशी संवाद साधल्यावर सर्वांनाच थंडगार पाणी, सरबत व नाष्ट दिला. त्यानंतर वानवडी बाजारमध्ये विनोद मथुरावाला यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये सभेची तयारी करण्याबरोबरच सर्वांना थंड पाणी आणि आइसक्रिमची सोय केली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...