पुणे-महाराष्ट्रात प्रत्येक गावात व ठिकठिकाणी जनतेच्या हिताकरीता काँग्रेसने काढलेल्या
जनसंघर्ष यात्रेचे स्वागत जनतेने केले आहे. गेल्या ४ वर्षात मोदी सरकारने जनतेला दिलेले
कुठलेही आश्वासन पूर्ण केले नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव
वाढले आहेत. हवालदिल झालेला शेतकरी, त्रस्त झालेली सर्वसामान्य जनता सरकारच्या विरूध्द
आपला रोश व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करून त्यात सहभागी
होत आहे. पुण्यात उद्या जनसंघर्ष यात्रा विविध मतदार संघात जाणार आहे. जनसंघर्ष यात्रेचे
स्वागत करण्यासाठी पुणे शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी होर्डिंग, फ्लेक्स बोर्ड, बॅनर
लावून आणि ढोल, लेझिम व हलगी वाजवून करणार आहेत.
दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी सायं. ५.०० वा., पुण्याच्या एस. एस. पी. एम. एस. ग्राऊंडमध्ये
जनसंघर्ष यात्रेची समारोप सभा होणार आहे. सभेच्या तयारीसाठी आमदार अमर राजुरकर
यांची निरिक्षक म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. आज एस. एस. पी. एम. एस. मैदानाची
पाहणी करण्याकरीता निरिक्षक आमदार अमर राजुरकर, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी
आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, विनायक देशमुख, गटनेता अरविंद
शिंदे, अजित दरेकर, उपाध्यक्ष शेखर कपोते, कामगार नेते सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.
![काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा व समारोप सभेची जय्यत तयारी.](https://mymarathi.net/wp-content/uploads/2018/09/Congress-copy.jpg)