पुणे –
पुणे शहर ज़िल्हा काँग्रेस कमिटी पार्वती विधानसभा मतदार संघ काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आज रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, पुणे सातारा रोड येथे संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाल सबनीस ( जेष्ठ साहित्यिक ), प्रमुख पाहुणे हर्षवर्धन पाटील ( माजी मंत्री महा. राज्य ), आमदार विश्वजीत कदम ( अध्यक्ष म. प्र. यु. काँ. ), कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश बागवे ( अध्यक्ष पुणे शहर ज़िल्हा काँग्रेस कंमिट्टी ) उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
श्रीपाल सबनीस आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले ….सर्वात जुना व देशाला लोकशाही मूल्ये रुजवणारा पक्ष म्हणून ख्याती असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेस शिवाय देशाला तारुन नेऊ शकणार दुसरा कोणताही पक्ष नाही. काँग्रेस पक्षाने गांधीजींचा वारसा जपल्यास काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांत अधिक दृढ होईल असेही ते म्हणाले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले .. जी लोक काम करतात त्यांच्यावरच टीका होते. भाजपा कडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधान टीका करत असल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केले.
उल्हास पवार म्हणाले… पंतप्रधान मोदी हे काँग्रेस द्वेषाने पछाडलेले असून पंडित जवाहरलाल नेहरूंचे कार्य झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अभय छाजेड म्हणाले … भ्रष्टाचार कोण करतं काँग्रेस करतं, जातीवाद कोण करतं , असे अमित शहा म्हणतात, परंतु या सर्व गोष्टी भाजपच करत असून स्वतःच्या चुकीच्या गोष्टी काँग्रेसच्या नावावर ढकलण्याचे काम भाजप करत आहे. भाजपच्या
चार वर्ष्याच्या कारकीर्दीत देशाला आर्थिक आघाडीवर दहा वर्ष मागे ढकलण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप अभय छाजेड यांनी केले.
रमेश बागवे म्हणाले .. मोदी सरकारची चार वर्षाची कारकीर्द पूर्णतः अपयशी ठरल्याची टीका शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते गटतट विसरून जोमाने कामाला लागले पाहिजे.
या प्रसंगी नवनिर्वाचित आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा महात्मा गांधी यांची प्रतिमा व पुष्पगुछ ,शॉल देऊन मा. हर्षवर्धन पाटील, श्रीपाल सबनीस, उल्हास पवार, शरद रणपिसे, रमेश बागवे, अभय छाजेड यांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे , गोपाळ तिवारी, विकास लांडगे, , अमीर शेख. आबा बागुल, अजित दरेकर, सोनाली मारणे ,अरविंद शिंदे, मोहन जोशी, संजय बालगुडे, पी.ए.इनामदार, मनीष आनंद,सुनील शिंदे, नीता राजपूत, सहानी नौशाद, संगीता तिवारी, राजेंद्र भुतडा, द. स. पुळेकर, अमरजितसिंग मक्कड, रमेश अय्यर, रमेश टकट, राजेंद्र सिरसाट, मामा तुपे, व असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. सूत्रसंचालन आभार द. स. पुळेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन अभय छाजेड यांनी केले.


