पुणे- २८ डिसेंबर १८८५ मध्ये म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्थापन झालेल्या कॉंग्रेस पक्षाचा उद्या १३२ वा वाढदिवस आहे . ज्यास आपण वर्धापन दिन असे संबोधतो .महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री ,दादाभाई नौरोजी,वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी ,वसंतदादा पाटील ,यशवंतराव चव्हाण ,राजीव गांधी,शंकरराव चव्हाण अशा असंख्य दिग्गज नेत्यांचा पक्ष ,स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्षात ब्रिटिशांशी लढलेला पक्ष म्हणून ज्या राजकीय पक्षाची ख्याती आहे तो एकमेव पक्ष उद्या १३२व वर्धापन दिन साजरा करतो आहे . या पक्षाची प्रतिमा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून कायम टिकून राहीली . गांधी घराण्याच्या बलिदानाचे कवच असलेला ,असंख्य वादळातही मोठ्या हिकमतीने टिकलेला पक्ष ..म्हणून या पक्षाकडे पाहिले जाते .
१३२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यासाठी पुण्यातील कॉंग्रेस भवन आज सायंकाळी सज्ज झाले होते . कुठे चहाचे कप कोणते हवे , नाष्टा कसा हवा , इमारतीला लाईटच्या माळा कशा हव्यात , मांडव कसा हवा ?निमंत्रणे पाठविली काय ? फोन केलेत काय ? अशा साऱ्या कामकाजाची इथे आज लगबग सुरु होती .शहर अध्यक्ष रमेश बागवे, तसेच नगरसेवक अजित दरेकर , आणि रमेश अय्यर, गेली ३७ वर्षे येथे कार्यरत असलेले उत्तम भूमकर आदी कार्यकर्ते उद्याच्या सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असताना ..केलेला हा व्हिडीओ रिपोर्ट …

