पुणे– गोविंदा आला रे आला … च्या बँडबाजाच्या धून वर पुण्यातील कॉंग्रेस भवनात 2 माजी मंत्र्यांनी भन्नाट नृत्य करीत राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरील निवडीने आनंद व्यक्त करीत जल्लोष केला . माजी अध्यक्ष ,आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनींच कॉंग्रेस भवनातील या आनंद व्यक्त करणाऱ्या नृत्य सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेत जल्लोष केला .
आज राहुल गांधी यांनी अखिल भारतीय कोंग्रेस पक्षाची अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली, त्या निमित्ताने येथे आज फटके फोडण्यात आले , पेढे ,जिलेबी , मिठाई वाटण्यात आली . पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी शहर कॉंग्रेसच्या बैठकीत अभिनंदनचा ठराव मांडला व कमल व्यवहारे यांनी अनुमोदन दिले, यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर , माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड ,खडकी कँटोमेंट बोर्डाचे सदस्य मनीष आनंद,शहर महिला अध्यक्ष सोनाली मारणे, युवक अध्यक्ष विकास लांडगे, सुरेश बोराटे ,संगीता तिवारी,रमेश अय्यर व सर्व जेष्ठ पदाधिकारी, नगरसेवक, महिला फ्रंट, सेवादल, सर्व सेल, चे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदेड महापालिकेच्या विजयानंतर शहर कॉंग्रेस मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते . आता राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या निवद्मुळे पक्षात आणखी चैतन्य निर्माण झाले आहे. कॉंग्रेस भवन मध्ये होणाऱ्या गर्दीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे .