अभिषेक आसोरे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अव्वल -सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात आयोजित स्पर्धेचा सविस्तर निकाल पहा इथे …
पुणे : कॉंग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द.मि.कै.सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत अभिषेक आसोरे याने सर्व गटातून सर्वोकृष्ट पारितोषिक पटकाविले आहे. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली होती.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागुल आदी उपस्थित राहणार आहेत. तब्बल ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके विज्येत्यांना देण्यात येणार असून सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला होता.
* निकाल :
ज्युनियर.के.जी. – १) झैंद नाईकवाडे, २) ऋचा यादव, ३) आभा मायनल, उत्तेजनार्थ : प्रणाली सुरवसे, आलीया शेख.
सिनीयर के.जी. – १) अनुष्का तंगवडे, २) सिध्दी झगडे, ३) युविका ओसवाल, उत्तेजनार्थ : स्नेहा अगवणे, अर्चित काकडे.
इयता १ली ते २री – १) कविता दिनेश सविता, २) किमय लोढा, ३) श्रेयस जाधव, उत्तेजनार्थ : आयुष मिश्रा, आलीया शेख.
इयत्ता ३री ते ४थी – १) आरोही भाटे, २) गौरव म्हस्के, ३) तनिष्का भोसले, उत्तेजनार्थ : आर्यन खंडागळे, ऋतुजा तारु.
इयत्ता ५वी ते ७वी – १) रुचिता ढवळे, २) कुँवर मीन, ३) चिन्मयी कुरवडे, उत्तेजनार्थ : अमृता गायकवाड.
इयत्ता ८वी ते १०वी – १) पूर्वा गवळी, २) सुरक्षा शेट्टी, ३) रश्मी गोरे, उत्तेजनार्थ : कोमल कचरे, पायल गोलांडे.
इयत्ता ११वी ते १२ वी – १) नितीन थोरात, २) तेजस्वी भोजी, ३) यश मुदीगोंडा, उत्तेजनार्थ : सृष्टी चिद्दारवार, पल्लवी सावंतफुले. विशेष गट – १) समीर कद्रे, २) तनिष्का जोशी, ३) श्वेता डाळवाले, उत्तेजनार्थ : श्रेया ओक.
पालक गट – १) मिलींद नागपुरे, २) वृंदा तंगडपल्लीवार, ३) सावित्री पी, उत्तेजनार्थ : गिरीश चिद्दारवार, जयश्री थत्ते.
मूलभूत अभ्यासक्रम (फौंडेशन) – १) आयुषी चोपडा, २) शिल्पेक्ष दालोरकर, ३) वेदांत जोशी, उत्तेजनार्थ : अरुण खुळे
कला महाविद्यालय – १) अभिषेक आसोरे, २) केदार रोकडे, ३) अभिषेक उपासने, उत्तेजनार्थ : प्रतिक बनकर, अभिजय म्हस्के.