पुणे -कॅम्प भागातील ईस्ट स्ट्रीटवरील इंदिरा गांधी चौकात इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे ,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम वयांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे आयोजक पुणे शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नदीम मुजावर , उपाध्यक्ष सरताज खान , प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया ,शहर उपाध्यक्षा जॅकलिन फॉरेस्टार , प्रदेश सचिव मॅनवेल डिसोझा , शब्बीर शेख , शरीफ खान , मनोज पाटील , नाहिद मुजावर , सलीम शेख , बबलू वर्मा , हसन कुरेशी , कैलाशकुमार , जोसेफ पॉल , शाकीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनावरील आठवणींना उजाळा दिला .