पुणे-
अविनाश बागवे यांच्या प्रचारफेरीस मोठा प्रतिसाद
प्रभाग क्रमांक १९ मधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक अविनाश बागवे, नूरजहाँ शेख, रफिक अब्दुल रहीम शेख व काँग्रेस पुरस्कृत
उमेदवार जिल्लेहूमा खान यांच्या प्रचारार्थ लोहियानगर काशेवाडीत भव्य प्रचार रॅली पार पडली. तरुण, तडफदार, अभ्यासू नगरसेवक अशी प्रतिमा असलेल्या अविनाश बागवे यांचा दांडगा जनसंपर्क यावेळी पाहावयाला मिळाला. प्रभागातील अबाल, वृद्ध, तरुणांनी या वेळी या रॅलीत मोट्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या भव्य रॅलीत अंदाजे पाच ते सहा हजार हुन अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दुपारी २ वाजता नाणेशा कॉर्नर, पुना कॉलेज पासून सुरु झालेल्या रॅलीचा मार्ग संपूर्ण कशेवाडी, लोहियानगर, हरकानगर मधून होत चमनशाह दर्गा येथे या रॅली चा समारोप झाला. यावेळी संपूर्ण प्रभागात रॅलीचा फटाके वाजवून जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी उमेदवारांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
पार्लमेंट ते पालिका नुसत्या गाजरांची वाटप करणाऱ्या भा ज पा सरकारला काल पुणेकरांनी मुख्यमंत्रांच्या सभेवर बहिष्कार टाकून चोख उत्तर दिल्याचे बागवे यांनी सांगितले. अनेक बीजेपीचे नेते माझ्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करून मतदारांची दिशाभूल करण्याचे काम करत होते त्यांनी मी गुरुनानक नगर भवानी पेठ येथे खुली सभा घेऊन पुरावे सादर करण्याचे खुले आवाहन केले होते. परंतु त्यांचा साधा शिपाई सुद्धा आला नाही त्यामुळे बीजेपीचा खोडरडेपणा पुन्हा अधोरेखित झाला आहे असे बागवे यांनी सांगितले. तसेच लोहियानगर येथील एस.आर.ए प्रकल्पात प्रचंड घोटाळा झाला असून अनेक लोकांना बेघर करण्याचे पाप बीजेपीने केले आहे त्यामुळे यावेळी मतदार या बीजेपीच्या उमेदवारांना घरी बसवणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.
समारोपाच्या भाषणात अविनाश बागवे यांनी जातीयवादी धर्मांद पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचे अचूक अंदाज घेऊन वेळेत निवारण करनाऱ्या काँग्रेस पक्ष्याच्या उमेदवारालाच मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच पुढील पाच वर्षात लोहियानगर – काशिवाडी हा भाग स्मार्ट प्रभाग करणार असल्याचे बागवे यांनी सांगितले.
यावेळी समारोप करताना काशेवाडी प्रभागात गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामामुळे लोहियानगर काशेवाडी मधील मतदार काँग्रेसच्या हातालाच साथ देणार असल्याचा विश्वास मा. गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला.
यावेळी चारही उमेदवारांसोबत मा. गृहराज्य मंत्री रमेश बागवे, सौ झैनब बागवे, रशीद शेख, यासेर बागवे, जुबेर शेख, विठ्ठल थोरात, सौ. इंदिरा अविनाश बागवे उपस्थित होत्या