पुणे- महापालिका निवडणुकीचा प्रचार करताना गुरुनानक नगर येथील सभेत कॉंग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी भाजपा चे एमआयएम शी सेटिंग असल्याचा आरोप केला . एमआयएम आणि भाजप वर यावेळी त्यांनी सडकून टीका केली .
काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक अविनाश बागवे, नूरजहाँ अन्वर शेख, रफिक अब्दुल रहीम शेख व काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार जिल्लेहूमा खान यांच्या कोपरासभेचे येथे आयोजन केले होते. माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे , मोहन जोशी ,अभिनेता रझा मुराद,हास्य सम्राट असिफ अलबेला ,रशीद शेख विठ्ठल थोरात,अरुण गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .. पहा बागवे यांच्या भाषणाची हि झलक ….