पुणे -संजय काकडेंनी दादागिरी केली तर मी पुण्यात येवून पाहतो त्यांचे … असे आव्हान देत भाजपवर तर शिवसेनेचा वाघ आता मांजर बनलेला आहे अशा शब्दात टीका करीत राज्यातील हे सरकार 21 तारखेपर्यंत राहील का नाही माहीत नाही, असा प्रश्न उपस्थित करीत सरकारच्या भविष्याविषयी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शंका उपस्थित केली आहे.
पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडेसहा वाजता नारळ फोडून काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. गंज पेठेमधील महात्मा फुले स्मारकासमोर नारायण राणे यांच्या सभेने प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे, विधान परिषद आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, उपमहापौर मुकारी अलगुडे, गटनेते अरविंद शिंदे आणि उमेदवार उपस्थित आहेत.
सभेत नारायण राणे पुढे म्हणाले की, प्रत्येकाला काकडे सारखा खासदार व्हावे वाटते. कारण उमेदवारी ही मिळते आणि पैसा ही खर्च करता येतो.यावरून भाजप ला आरबीआय जॉइन झाली का ? असाही प्रश्न त्यांनी केला. भाजप शिवसेनेने राज्याला मागील अडीच वर्षात 10 वर्ष मागे घेऊन गेले. भाजप सुसंकृत पक्ष वाटायचा पण आता पुण्यात आलो की गुंडाचा पक्षाचा वाटतो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांच्या विरोधात तोंडाने मर्डर करतात. ते आणखी बाकी काहीही करू शकत नाही. तर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी खूर्ची नागपूरला घेऊन जावी. काय तर म्हणे पाच वर्ष सत्तेत राहणार, असेही टिकास्त्र सोडले. तर शिवसेनेकडे आता वाघ राहिला नाही. वाघाची मांजर झाली आहे, अशी टीका शिवसेनेवर केली.
तर खासदार संजय काकडे राजकारणात काय करतात, असा प्रश्न करत दादागिरी केली. तर शेवटचे दोन दिवस मी येऊन बसतो बघू काय दादागिरी करता, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.
शहराबाबत राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून कायम आदर आहे. पुणे शहर पहिल्यासारखे राहीले नाही. पुणे शहरात मागील अडीच वर्षात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणीही सुरक्षित नाही.असेही ते म्हणाले .