पुणे-.. वाट्टेल ते सहन करू…भारताची राज्यघटना कोणाला पायदळी तुडवू देणार नाही, कोणाला बदलू देणार नाही , घटनेच्या संरक्षणासाठी आमचे आता आयुष्य वाहू …. अशी सामूहिक शपथ आज काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे आपल्या प्रमुख नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली घेतली .
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, तसेच विश्वजित कदम,अभय छाजेड , शरद रणपिसे,मोहन जोशी , दीप्ती चौधरी,आबा बागुल , अरविंद शिंदे,रोहित टिळक ,अजित दरेकर,यांच्यासह पक्षाचे निवडणूक लढवित असलेले इच्छुक उमेदवार ,दत्ता बहिरट आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .